मालवणी 'नटसम्राट'
तात्यानु, ओ तात्यानु ..
कशे आसास ओ, आज म्हटला तुमच्या गजालीक येवया .. ह्या बघा हयसरले सगळेजण सांगतत तुम्ही आजच्या दिवशी आमकां सोडून गेलास पण माका नाय वाटत तुम्ही गेलास ... माका वाटता देवाक हसवूक स्वर्गात गेलास .. तुम्ही आसपास आसास आमच्या .. अनाकलनीय अस्तित्व जाणवता ओ तुमचा . बरा मी काय म्हणतंय चाय घेवा घोटभर .. चाय पे चर्चा करूया आपण ... तुमका कायतरी सांगान सा वाटता हा ...
कधीकाळी आमच्या मुंबयत मालवणी बोलताना लोकांका लाज वाटायची. आता तीच मंडळी खय पण गेली तरी मालवणी बिनधास्त बोलताना दिसतत. तुम्ही आणि गवाणकरांनी जा काय आमचा ( मुद्दाम आमचा म्हणतंय) 'वस्त्रहरण' केलास ना त्येका तोड नाय ओ .. गावचो सरपंच इतको भारी ना की तो कधीच रिटायर होवचो नाय .. आमच्या 'ओळखीच्या' दाखल्यावर तात्या सरपंच ची सही हीच अभिमानाची बाब हा ... तात्यानु मिया लहान होतंय त्यापासून 'वस्त्रहरण' आयकत इलय.. अगदी शब्दान शब्द पाठ हा .. काय जादू केलास ती तुमकाच ठावक .. पु. ल. देशपांडे यांनी ह्या नाटक किती विनोदी आणि इरसाल आसा ह्या सांगितल्यानंतर अजूनही ह्या नाटक ‘हाऊसफुल्ल’ चोच बोर्ड लावन हा..
तात्यानु,
आमची गावची पोराटोरा आज पोटापाण्याक गाव सोडून भायर असलाव तरी मालवणी कधी सोडूचाव नाय .. ह्यो शब्द हा माझो .. कोकणात रेल्वे इली त्येच्यात आज मालवणी गजालींचे फड रंगताना आयकाक येतत.. अगदी मुंबईत बाजारात, रस्त्यावर, बसमध्ये जरी कोण मालवणी माणूस भेटलो तरी न संकोच करता मालवणी मध्ये सुरू होतंय.. आज फेसबुकवर लाखो च्या संख्येत लोकं मालवणीत लिवतत, गजाली मारतत.. यामागे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आसास ह्यात तिळमात्र शंका नाय ओ ..
आजून तुमि बोललेलो एक इशय खरो होताहा आमच्या कोकणात 'भैया हातपाय पसरी' हीच स्थिती तयार झाली हा .. ओ तात्यानु, सिंधुदुर्गात येवन भैया छटपूजा करूंक लागले हत आणि आमकां गावाक गणपती क जावक सुट्टी मिळणा ना म्हणून कारण देताव .. नारळ काढून देवक, माशे इकुक, खारी बटर इकुक, केळी इकुक, रस्ते बांधुक इतक्याच काय तर घरगडी म्हणून आमकां भैया जवळचो वाटाक लागलो हा .. एक दिवस असो येत की घरातलो देव पुजूक पण आमकां भैयाक सांगाच लागतला ..
तात्यानु आता कायतरी तुम्हीच करा ओ.. सुस्तवलेल्या अशा मालवणी माणसांच्या कमरेत लाथ घाला .. चार गाळी घाला..काय वाटेल ता करा पण कोकण अन मालवणी माणूस ओळख पुसली जाता नये...
बरा याक सांगाचा रव्हला.. तुमच्या मागे तुमचो झिल प्रसाद ( तसे आम्ही पोरगे तूमचेच झिल आसव) भक्कमपणे 'भद्रकाली' सांभाळता हा .. आज ५५ नाटका यशस्वी झाली ती तुमच्या अन प्रसादच्या कणखर प्रयत्नांमुळे.. संगीत 'देव बाभळी' सारख्या नाटक आमच्यापुढे आणल्यान हा ता धाडस करूचा बळ तुम्हीच दिलास ना ..काय म्हणतास .. तुमि अजिबात काळजी करू नको ..आम्ही 'भद्रकाली' च्या मागे किंबहुना प्रत्येक मालवणी कलाकृती च्या मागे उभे आसाव...
बरा तात्यानु आता थांबतय .. तुमचो कायम हसनारो चेहरो आमकां नवीन ऊर्जा देयत असता.. परत गजालीक येतलास ह्या माहीत हा तरीपण आवाज देवा तसोच हजर होतंय बघा.. माका माहीत हा 'वस्त्रहरण ' मध्ये तुम्ही येतास ते आमच्या दिगंबर दादाच्या अंगात .. होय तुम्हीच .. आज तुमच्यामागे बरेच कलाकार मालवणी जपतत..त्येंका आशीर्वाद देवा हा ..
आज तुमच्याशी गजाली करूचा धाडस केलंय .. काय चुकला तर पोटात घाला .. ह्या मालवणी झिलग्याकडून मालवणी 'नटसम्राट' मच्छिंद्र कांबळीका मानाचो नमस्कार ...
येवा मालवणी आपलाच आसा ...
तुमचोच मालवणी झिलगो
नितीन नाईक (कणकवली)
मो- ८१०८२१८०९२

Comments
Post a Comment