तात्या परत इले




                    रे देवा महाराजा, बारा गावच्या ,बारा राटीच्या,
बारा वहिवाटीच्या महाराजा , आज सांगना करण्यास कारण महाराजा, आज सालाबादप्रमाणे आमच्या बालगोपाळांनी ह्यो कार्यक्रम सादर करुचो ठरवल्यानी हा महाराजा,  तो सुरळीतपणे पार पाडून घे रे महाराजा, जर का कुणी भायरचा भुतुर , भुतुरचा भायर , चालगती सोडल्यानी आसात तर वडाची साल पिंपळाक कर , पिंपळाची साल वडाक कर , त्येचे दात त्येच्या घशात घाल रे महाराजा अंधारमेळ्याचा बारापाचाचा गणित याक कर रे महाराजा , एकाचे एकवीस कर, पाचाचे पंचवीस कर, असलेल्या नसलेल्या बालगोपालांका सुखी ठेव रे महाराजा ....
आणि आमचो झेंडो फडाच्या फडाक सामील करून घे रे महाराजा .
     
        तात्यांनी दणदणीत गाराणा घातल्यानी आनी ता आयकत असताना आपोआप 'होय sss महाराजा ' शब्द तोंडातून निघत होते.. अहो खय  म्हणून काय ईचारतास आमचे तात्या शिवाजी मंदिर मधे इले होते.. होय होय तेच तात्या सरपंच .. फक्त वायचसो चेहरो बदलून इलेले .. तुमी म्हणतास ना तशीच डीटटो आमचे मच्छिंद्र कांबळी हेंनी साकारलेली 'तात्या सरपंच ' ची भूमिका दिगंबर नाईक ( माझे भावकीतले म्हटल्यास तरी चालात ) हुबेहूब वटवल्यानी....
         लहानपणापासूनच मच्छिंद्र कांबळी (यापुढे तात्याच म्हणतंय ) यांचा 'संगीत वस्त्रहरण ' कानावर पडत होता अन ता तोंडपाठ पण झाला हा .. नुसता ऐकत रव्हलास तरी तुमच्या नजरेसमोर 'तात्या सरपंच ' उभे रव्ह्तत.. ते असताना माका कधी नाटक प्रत्यक्षात बघुक गावला नव्हता .. काही दिवसांपूर्वी प्रसाद कांबळी दादा आपल्या सर्वांच्या लाडक्या भद्रकाली प्रोडक्शन च्या बॅनर खाली ५०००हुन जास्त प्रयोग झालेला ' संगीत वस्त्रहरण ' पुन्हा घेवन येताहा ... साधारण २००९ मध्ये झालेला नाटक झी वर बघीतलय होतंय पण प्रत्यक्षात नाय ..
    आता नाटकाबद्दल बोलण्यासारख्या लय हा पन थोडा बोलतंय ... गावातल्या जत्रेत नाटक करायचा त्यासाठी तात्या सरपंच अन शाळेचे मास्तर हेंची होणारी दमछाक, आणि नाटकासाठी लागणारी पात्रा निवड यांची पॉट धरूक लावणारी धमाल ह्योच नाटकाचो विषय ...  तसा बघुक गेलास तर नाटकात अनेक पात्रा आसत पण लक्षात रव्ह्तत ती नेमकी ३ पात्रा.. तात्या सरपंच, शाळेचे मास्तर आणि पडदे ओढणारो गोप्या ..
         नाटक बघताना प्रेक्षक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यत हसत रव्ह्तीत हेचि काळजी लेखक श्री.गंगाराम गवाणकर ह्यांनी घेतल्यानी हा .. वस्त्रहरण टीम ची मेहनत नाटक बघताना जाणवता .. दिगंबर नाईक यांनी साकारलेले तात्या सरपंच तुम्ही नाटक बघुन घराक इलास तरी लक्षात रव्ह्तले .. मुकेश जाधव हेना केलेली गोप्याची भूमिका तर तुम्ही नक्की डोक्यावर घेतलास .. समीर चौगुले, अंशुमन विचारे, किशोर रावराणे, प्रभाकर मोरे, किशोरी आंबीये ताई, रेशम टिपणीस, पेम कुटुंब, दुनियादारी फेम प्रणव रावराणे, प्रदीप पटवर्धन, मास्तरांच्या भूमिकेत मंगेश कदम, शशिकांत केरकर अशा प्रत्येकाने जीव ओतून काम केल्यानं हा आणि त्येंचा काम लक्षात घेण्याजोग्या हा ...
मच्छिंद्र कांबळी नी अन गंगाराम गवाणकर यांनी अजरामर केलेली कलाकृती पुनःश्च रंगभूमीवर आनुची किमया ( शिवधनुष्य म्हणा) प्रसाद कांबळी दादाने केल्यानं हा  .. नाटकाला तुषार सोबत इतर मंडळीनी दिलेली संगीत साथ तर लय भारी ...
   
     "त्या माणसांवर झाडा कित्याक बसली हत " , "तात्या तात्या संगीताचो घोळ झालो..सगळी मयता वाद्यांक गेली हत" , "म्हशीच्या गळ्यात एकच घंटा होती ती घेवन इलय ",  "ह्यो तुमचा देव.. थांबा पाया पडून घेते ", " तात्या तात्या मास्तर ताठ" , "बघलास आमकां कसली व्यसना अन देवाक कसली व्यसना", " हे राजा तुझे धने जिंकले", "हेंच्यापासून माका पाच पोरा झाली हत" अशे अनेक डायलॉग तुमकां पॉट धरून हसवुक लावतीत ...
           नाटकाचो इतिहास तर तुमकां माहीतच हा ..  मच्छिंद्र कांबळीनी तुमची आमची लाडकी #मालवणी भाषा सातासमुद्रापार पोचवल्यानी .. साक्षात पुलं देशपांडे सारख्या व्यक्तिमत्त्व वस्त्रहरण च्या प्रेमात पडलं .. मी स्वतः नाटक बघितलंय . नुसता आवडलाच नाय तर काळजात घुसला ..पुन्हा बघुक जातलयच.. आता तुमची बारी एकदा तरी तुमच्या आजूबाजूच्या नाट्यगृहात आमचा मालवणी 'संगीत वस्त्रहरण' बघाच .
        श्री महाकाली कालभैरव संयोग संगीत नाटक मंडळ सविनय सादर करत आहे
संगीत वस्त्रहरण ...संगीत वस्त्रहरण .....

 तात्यानु ह्या जा काय लिव्हलय ता तुमच्या प्रेमापोटी ... अशीच मालवणी ची सेवा आमच्या हातून होत रव्हानदेत तेवढी शक्ती देवा आमकां ...
                                              तुमचोच मालवणी झिलगो

   नितीन नाईक
   (कणकवली )
(८१०८२१८०९२)

 
         

Comments

Popular posts from this blog

प्रश्नांचा उत्तर

लाल डब्याचो राजा