शिमगो ....
को रे तो काजीत ?? थांबा येतंय तुमची तंगडी च मोडतय नाना भल्या दुपारी काजीच्या कुडणात २ -३ टकली बघून ओराडले.. दुपारचे २ वाजले होते, रानातल्या वाड्यात जेवण झाल्यावर नाना वाईच पडले होते तेव्हा तेंका हालचाल दिसली . तसेच उठले वयचा बेळा बाजूक करून काजीच्या कुडणात धाव घेतल्यानी एवढ्यात तिघे जण दिसले "काय रे मायझयानु , इतक्या हिमराचे माझ्या कुडणात काय करतास,आणि ही पिशी कसली रे ? " नाना रागातच पण प्रश्नार्थक नजरेत बोलले . "नानानू तुम्ही समजतास तसा काय नाय ओ , माझो भाचो इलो हा मुंबयेसून तेचा आंब्याची तोरा होई होती ..म्हनुन म्हटलंय तुमच्या कुडणातल्या झाडावर गावतीत , तुमच्या घराकडे गेललाव तुमका ईचारूक पण तुम्ही गावाक नाय " त्या तिघातलो एक जण उत्तरलो "मेल्यानु,माका वाटला काजी चोरूक इलास की काय" मनाकडे हायसा झाल्यासारखे नाना बोलले ... तेंचा पण बरोबर आसा, काही वर्षांपूर्वी शेती सोडल्यापासून २०० स्वतः काजीची कलमा घेवन आपल्या जमिनीत लावल्यानि होती ..शेती अधिकारी चो स...