Posts

Showing posts from September, 2018

मालवणी 'नटसम्राट'

Image
    तात्यानु, ओ तात्यानु ..           कशे आसास ओ, आज म्हटला तुमच्या गजालीक येवया .. ह्या बघा हयसरले सगळेजण सांगतत तुम्ही आजच्या दिवशी आमकां सोडून गेलास पण माका नाय वाटत तुम्ही गेलास ... माका वाटता देवाक हसवूक स्वर्गात गेलास .. तुम्ही आसपास आसास आमच्या .. अनाकलनीय अस्तित्व जाणवता ओ तुमचा . बरा मी काय म्हणतंय चाय घेवा घोटभर .. चाय पे चर्चा करूया आपण ... तुमका कायतरी सांगान सा वाटता हा ...     कधीकाळी आमच्या मुंबयत मालवणी बोलताना लोकांका लाज वाटायची. आता तीच मंडळी खय पण गेली तरी मालवणी बिनधास्त बोलताना दिसतत. तुम्ही आणि गवाणकरांनी जा काय आमचा ( मुद्दाम आमचा म्हणतंय)  'वस्त्रहरण' केलास ना त्येका तोड नाय ओ .. गावचो सरपंच इतको भारी ना की तो कधीच रिटायर होवचो नाय .. आमच्या 'ओळखीच्या' दाखल्यावर तात्या सरपंच ची सही  हीच अभिमानाची बाब हा ... तात्यानु मिया लहान होतंय त्यापासून 'वस्त्रहरण' आयकत इलय.. अगदी शब्दान शब्द पाठ हा .. काय जादू केलास ती तुमकाच ठावक ..  पु. ल. देशपांडे यांनी ह्या नाटक किती विनोदी आणि इरसाल आसा ह्या सांगि...