Posts

Showing posts with the label #मालवणी #भद्रकाली #वस्त्रहरण #मच्छिंद्रकांबळी #तात्या

तात्या परत इले

Image
                    रे देवा महाराजा, बारा गावच्या ,बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या महाराजा , आज सांगना करण्यास कारण महाराजा, आज सालाबादप्रमाणे आमच्या बालगोपाळांनी ह्यो कार्यक्रम सादर करुचो ठरवल्यानी हा महाराजा,  तो सुरळीतपणे पार पाडून घे रे महाराजा, जर का कुणी भायरचा भुतुर , भुतुरचा भायर , चालगती सोडल्यानी आसात तर वडाची साल पिंपळाक कर , पिंपळाची साल वडाक कर , त्येचे दात त्येच्या घशात घाल रे महाराजा अंधारमेळ्याचा बारापाचाचा गणित याक कर रे महाराजा , एकाचे एकवीस कर, पाचाचे पंचवीस कर, असलेल्या नसलेल्या बालगोपालांका सुखी ठेव रे महाराजा .... आणि आमचो झेंडो फडाच्या फडाक सामील करून घे रे महाराजा .               तात्यांनी दणदणीत गाराणा घातल्यानी आनी ता आयकत असताना आपोआप 'होय sss महाराजा ' शब्द तोंडातून निघत होते.. अहो खय  म्हणून काय ईचारतास आमचे तात्या शिवाजी मंदिर मधे इले होते.. होय होय तेच तात्या सरपंच .. फक्त वायचसो चेहरो बदलून इलेले .. तुमी म्हणतास ना तशीच डीटटो आमचे मच्छिंद्र कांबळी हेंन...