शिमगो ....




को रे तो काजीत ?? थांबा येतंय तुमची तंगडी च मोडतय
         नाना भल्या दुपारी काजीच्या कुडणात २ -३ टकली बघून ओराडले.. दुपारचे २ वाजले होते, रानातल्या वाड्यात जेवण झाल्यावर नाना वाईच पडले होते तेव्हा तेंका हालचाल दिसली . तसेच उठले वयचा बेळा बाजूक करून काजीच्या कुडणात धाव घेतल्यानी एवढ्यात तिघे जण दिसले
     "काय रे मायझयानु , इतक्या हिमराचे माझ्या कुडणात काय करतास,आणि ही पिशी कसली रे ? "
नाना रागातच पण प्रश्नार्थक नजरेत बोलले .
  "नानानू तुम्ही समजतास तसा काय नाय ओ , माझो भाचो इलो हा मुंबयेसून  तेचा आंब्याची तोरा होई होती ..म्हनुन म्हटलंय तुमच्या कुडणातल्या झाडावर गावतीत , तुमच्या घराकडे गेललाव तुमका ईचारूक पण तुम्ही गावाक नाय " त्या तिघातलो एक  जण उत्तरलो
       "मेल्यानु,माका वाटला काजी चोरूक इलास की काय" मनाकडे हायसा झाल्यासारखे नाना बोलले ...
        तेंचा पण बरोबर आसा, काही वर्षांपूर्वी शेती सोडल्यापासून २०० स्वतः काजीची कलमा घेवन आपल्या जमिनीत लावल्यानि होती ..शेती अधिकारी चो सल्लो घेवन ते जसे सांगत तसे खत, पाणी घालत, कलमांच्या चारही बाजूक स्वतः वय केल्यानी होती, माळावर जागा होतीच ढोरा बांधुचो वाडो रिकामी होतोच तेच्यातच सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत (दुपारच्या जेवणासकट) रव्हायचे .. यंदा काजीचो मौसम पण बरो वाटलो, थंडी पण बरी होती, काजी चो मोहूर पण मस्त इलो होतो .. नाना तसो घरात एकटोच कमवनारे, झिल कॉलेजमध्ये शिक्षण , बायको घराकडे घरकाम करत होते,
   सुखी जोडप्यासारखा सगळा व्यवस्थित चालला होता.. साधारण शिमग्याच्या आसपास चो  हंगाम होतो .. काजी किती गावतीत हेचो अंदाज नानाक त्या शेती अधिकाऱ्यांनी सांगितल्यानी होतो , मजूर घालून पण ते लक्ष देतीत की नाय हेचो इचार करुन नाना स्वतः वाड्यात रव्हाक जायचे ..
    तो होळीचो दिवस होतो , घरात सणासुदीचा वातावरण होताच... झिलाक पण सुट्टी होती,  एकदा तरी तेका कलमा दाखवून आणूक होई ह्या इचारान संध्याकाळी वेळ मिळणार नव्हतो म्हणून नाना सकाळीच झिलासोबत  माळावर जावन इले ...
     होळी रे होळी.. होलदो ,होलदो अशी आरोळी  आयकाक इली तशी नानांची पावला देवळाकडे निघाली .. कोकणातलो शोमगो काय येगळो सांगाक होयो काय .. रातभर नुसता धुमशान ....
    इतक्यात वाडीतलो शिरगो आरड घालीत इलो , अरे ऐका देवाच्या माळावर आग लागली हा , नानांच्या वाड्यापर्यत आग इली हा.....
      सगळा वातावरण एका क्षणात शांत झाला, 'कुणाक दुर्बुद्धी सुचली म्हणून आग लावल्यानं ' जो तो कुजबुजाक लागलो , नाना तसेच उठले अन कांबळा घेवन वाड्याकडे जावक निघाले .. लावलेली कलमा सुरक्षित रव्हानदेत म्हणून त्या होलिका देवीक अन देवांका गाराणा करीत निघाले .. त्यांच्या पाठोपाठ वाडीतले तरने पॉर दिंड्याचे टाळ घेवन पोचत होते.. देवळाजवळून त्या माळावर लागलेली आग स्पष्ट दिसत होती ...नानांका आगीचो धूर अन लोळ बघूनच धडकी भरली होती.. वय पेटली त्याच्या पाठोपाठ कलमा पण नजरेदेखत भस्मसात होत होती ... हा हा म्हणता सगळा रान आगीच्या पोटात गेला होता ..
    नाना डोक्याक हाथ लावन बसले , आज होळी अन त्यात काजीच्या कलमांची झालेली ' होळी' यामुळे रडकुंडी परतले होते.. पुढे काय करणार ह्यो यक्षप्रश्न ..
    दुसऱ्या दिवशी सकाळी शेती अधिकारी , ग्रामसेवक, तलाठी ,सरपंच पंचनामो करूक इले, नानांका उसनो धीर देत होते,
'नानानु , लवकरच तुमका नुकसानभरपाई चो चेक भेटात ' शेती अधिकारी जाता जाता सांगान गेलो ..
           नाना, नानी , झिल पुढे येणाऱ्या परिस्थितिचो अंदाज बांधत होती, पोराचा शिक्षण , घराची दुरुस्ती आता त्या मिळणाऱ्या पैशात करुची होती .. नव्या उमेदीन नानानी पुन्हा काम करूचा ठरवल्यानी ...
      "नानानु, तुमचो चेक इलो हा ग्रामपंचायतीत" नानांचा निरोप इलो तसे ते निघाले ,
आज २ महिने झाले , २०० काजी जळाले होते, नुकसानभरपाई तरी किमान गावात ह्या ईचारात नाना पोचले
  नानानू , ह्यो घेवा तुमचो चेक
नाना-  ओ , सायब किती रुपये लिवले हत
    नाना , यावर १९० रु मात्र लिवलेले आसत ...
नाना - ओ ,पुन्हा बघा कायतरी चुकला आसत तर माझोच चेक हा काय बघा, की रक्कम लिवक चुकले ...
   नाही , ओ नाना हे बघा तुमचे नाव , अन ही रक्कम

       क्षणभरात नाना तिथेच कोसळले ,
२०० कलमांची नुकसानभरपाई अवघी १९० रुपये? कित्या केलंय मग मी लागवड, सरकार नक्की कोणाचा हा, पंचनामो तर बरोबर केल्यानी होतो ना मग मधले पैसे खय गायब झाले?? आता पुढे काय करूचा हेचा ?? झिलाचा शिक्षण,घराची दुरुस्ती सगळा तेच्या मनात घुमत होता ...
  नाना उठाचो प्रयत्न करीत होते एवढ्यात देवा न्हे रे असा दीर्घ श्वास घेत नाना पुन्हा जमिनीवर कोसळले ते कायमचेच  .. त्यांच्या हृदयाची टिकटिक थांबली होती , डोळे तशेच उघडे रव्हले, एक हाथ छातीवर तर दुसऱ्या हातात गच्च मुठीत धरलेला होतो तो १९० रुपयांचा चेक
       

शब्दांकन - नितीन नाईक (कणकवली)
मो- ८१०८२१८०९२
#मालवणीझिलगो
ट्विटर- @minitinnaik
         

Comments

  1. खुप मस्त नितीन सर कोकणी माणपस सुखी समजान अवकाळी पावसाचा नुकसान आणि असा काय तरी बागायतीत झाला काय आपल्या कोकणावर खरच सरकार लक्ष नाय देत. बाकी लेखन अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रश्नांचा उत्तर

लाल डब्याचो राजा

तात्या परत इले