Posts

तात्या परत इले

Image
                    रे देवा महाराजा, बारा गावच्या ,बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या महाराजा , आज सांगना करण्यास कारण महाराजा, आज सालाबादप्रमाणे आमच्या बालगोपाळांनी ह्यो कार्यक्रम सादर करुचो ठरवल्यानी हा महाराजा,  तो सुरळीतपणे पार पाडून घे रे महाराजा, जर का कुणी भायरचा भुतुर , भुतुरचा भायर , चालगती सोडल्यानी आसात तर वडाची साल पिंपळाक कर , पिंपळाची साल वडाक कर , त्येचे दात त्येच्या घशात घाल रे महाराजा अंधारमेळ्याचा बारापाचाचा गणित याक कर रे महाराजा , एकाचे एकवीस कर, पाचाचे पंचवीस कर, असलेल्या नसलेल्या बालगोपालांका सुखी ठेव रे महाराजा .... आणि आमचो झेंडो फडाच्या फडाक सामील करून घे रे महाराजा .               तात्यांनी दणदणीत गाराणा घातल्यानी आनी ता आयकत असताना आपोआप 'होय sss महाराजा ' शब्द तोंडातून निघत होते.. अहो खय  म्हणून काय ईचारतास आमचे तात्या शिवाजी मंदिर मधे इले होते.. होय होय तेच तात्या सरपंच .. फक्त वायचसो चेहरो बदलून इलेले .. तुमी म्हणतास ना तशीच डीटटो आमचे मच्छिंद्र कांबळी हेंन...

लाल डब्याचो राजा

Image
पावसाळ्याचे दिवस होते. कोकण रेल्वे मधून पावसाचा अनुभव घेण्यासाठी दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन ने प्रवास करत कणकवलीत पोचलो, घड्याळात रात्रीचे ७.४५ वाजले होते, शेवटची st ८ वाजता निघते ती कशाही परिस्थितीत पकडायची म्हणून घाईघाईने रिक्षा करून बस स्थानकात पोचलो. पावसाच्या हलक्या सरी चालूच होत्या. '८ वाजता सुटणारी कणकवली-कळसुली फलाट क्रमांक ७ वर उभी आहे, हळवल-शिरवल कळसुली जाणारी बस फलाट क्रमांक ७ '  स्पीकर वर उद्घोषणा ऐकू येताच बॅग उचलुन फलाटाच्या दिशेने निघालो, एव्हाना st पूर्ण भरली होती, कशीबशी एक सीट मिळाली. पाऊस होता थोडं भिजायला झालंच होतं ,बॅग भिजू नये म्हणून वरच्या रॅक वर ठेवली. थोड्याच वेळात st चालू झाली अन गावच्या दिशेने निघाली.        "नितीना, खय रे , आता इलस काय? " कंडक्टर चा आवाज ऐकू आला, बघतो तर ते ओळखीचे कंडक्टर होते, कॉलेजमध्ये असताना महिन्याभराच्या प्रवासात त्यांची ओळख झाली होती.  "रासमानू, आज तुम्ही वस्तीक आसास? आपला माणूस या भावनेने मी त्यांना प्रतिप्रश्न केला. मग त्याच्या बाजूला जाऊन बसलो अन गप्पा चालू झाल्या. कंडक्टर ची ड्युटी...

शिमगो ....

Image
को रे तो काजीत ?? थांबा येतंय तुमची तंगडी च मोडतय          नाना भल्या दुपारी काजीच्या कुडणात २ -३ टकली बघून ओराडले.. दुपारचे २ वाजले होते, रानातल्या वाड्यात जेवण झाल्यावर नाना वाईच पडले होते तेव्हा तेंका हालचाल दिसली . तसेच उठले वयचा बेळा बाजूक करून काजीच्या कुडणात धाव घेतल्यानी एवढ्यात तिघे जण दिसले      "काय रे मायझयानु , इतक्या हिमराचे माझ्या कुडणात काय करतास,आणि ही पिशी कसली रे ? " नाना रागातच पण प्रश्नार्थक नजरेत बोलले .   "नानानू तुम्ही समजतास तसा काय नाय ओ , माझो भाचो इलो हा मुंबयेसून  तेचा आंब्याची तोरा होई होती ..म्हनुन म्हटलंय तुमच्या कुडणातल्या झाडावर गावतीत , तुमच्या घराकडे गेललाव तुमका ईचारूक पण तुम्ही गावाक नाय " त्या तिघातलो एक  जण उत्तरलो        "मेल्यानु,माका वाटला काजी चोरूक इलास की काय" मनाकडे हायसा झाल्यासारखे नाना बोलले ...         तेंचा पण बरोबर आसा, काही वर्षांपूर्वी शेती सोडल्यापासून २०० स्वतः काजीची कलमा घेवन आपल्या जमिनीत लावल्यानि होती ..शेती अधिकारी चो स...

प्रश्नांचा उत्तर

Image
              मस्त थंडी पडली होती म्हनान म्हटलंय फिरान येवया , पोराक शनिवारची सकाळची शाळा म्हणून शाळेत सोडून इलय वाटेत आबांचा घर दिसला .. म्हटला इलय तर हाक मारून जावया ..    सकाळीच  आबा ढोरा सोडून  येवन पेळेवर बसले होते ,हाक मारलंय ओ आबानू आबा-  बस रे कधी ईल ?काय म्हणता कामधंदो ? बायकोक नेतस काय मुंबयेत ? आबांनी प्रश्नांची रीघ लावल्यानी मी- पोराची पयली सुरू झाली की जून मध्ये नेतय मुंबईत, पोरांचो थोडो खर्च हा ( आबांची नजर माझ्या चेहऱ्यावर बरोबर होती ) बाजाराक लवकर जावक गावाक होया म्हणून आबा आज फाटफटी उठले होते , ९ ची एसटी तरी गावाक होई म्हणून सगळी धावाधाव चलली होती .. इतक्यात  काकी (आबांची बायको)  हातात झाडू घेवन खळा साफ करीत इली    ' ओ, वायच उठा , केर मारुचो हा आबा-    काय गो आज तू पण लवकर केर मारत तो     काकी -  काल गण्यान राती फोन केल्यानं सकाळी गावाक येतंय म्हनान , पोर येवक झालो , आजून सगळी कामा आसत तशीच हत ,  उठा लवकर हैसुन      आबा -  काय ...